Tuesday, February 7, 2023

नाडे येथील चोरी एकाच दिवसात मल्हारपेठ पोलिसांकडून उघडकीस

- Advertisement -

पाटण | तालुक्यातील नाडे सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या 32 हजार किमतीच्या मोटारीची चोरी एकाच दिवसात मल्हारपेठ पोलिसांनी उघडकीस आणली आहे. यामध्ये एका संशयितास ताब्यात घेतले आहे. नाडे सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पंप हाऊस मधील किर्लोस्कर कंपनीचे 60 एचपी मोटारी मधील दोन बोरिंग तसेच लोखंडी सॉकेट व दोन किलपा असा बत्तीस हजार रुपये किमतीच्या साहित्याची दि 19 सप्टेबंर रोजी मध्यरात्री घडली होती. त्या संदर्भात संस्थेचे ऑपरेटर प्रकाश पांडुरंग माने (रा. नाडे, ता. पाटण) यांनी 20 सप्टेंबर रोजी मल्हारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी व कर्मचारी यांना दाखल गुन्ह्याच्या सूचना देऊन तपासकामी पोलीस ठाणेची टीम तसेच गोपनीय माहितीदारामार्फत माहिती घेऊन तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी एक संशयित आरोपीस ताब्यात घेऊन याबाबत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याबाबत कबुली दिली.

- Advertisement -

संशयिताकडून चोरीस गेलेला बत्तीस हजार रुपये किमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपीस मल्हारपेठ पोलीस यांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. संशयितास न्यायालयाने मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केले आहे. तसेच आरोपीने अजून कोणत्या ठिकाणी अशाप्रकारे गुन्हे केले आहेत. याबाबत तपास चालू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करत आहेत.