औरंगाबाद | अमेरिकेसह ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात लसीकरण झालेले असताना मागील तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा आक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याचे भाकित मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले आहे. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन संवादमालेत ते बोलत होत.
लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन संवादमालेत डॉ. म्हैसेकर यांनी ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ या विषयावर रविवारी सकाळी ११ वाजता मागदर्शन केले. या बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोविड ही जागतिक महामारी आहे. त्यातुन माणसांना वाचण्यासाठी केवळ तीनच पर्याय उपलब्ध आहे. यात प्रत्येकाने लस घेतली पाहिजे, लस घेतल्यानंतरही चेहऱ्यावर मास्क घातले पाहिजे आणि बाहेर पडताना किमान सहा फुटांचे अंतर राखले पाहिजे. त्याशिवाय आपण या कोरोनाला हारवू शकत नाहीत. यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वत:चा वाटा उचलावा लागणार आहे. त्याशिवाय तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य होणार नाही, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
व्याख्यानाच्या प्रस्ताविकात जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी लोकसंवाद फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेत डॉ. म्हैसेकर यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. सूत्रसंचलन डॉ. कल्याण सावंत यांनी केले. आभार डॉ. हंसराज जाधव यांनी मानले. तांत्रिक सहाय्य निखील भालेराव यांनी केले. कार्यक्रमाला फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, डॉ. राम चव्हाण, डॉ. रविकिरण सावंत, डॉ. नवनाथ आघाव, डॉ. चंद्रशेखर हिवरे, प्राचार्य एन.के. बागुल, प्राचार्य डॉ. वसंत बावणे, डॉ. सचिन कदम, डॉ. हुनमंत भोसले, प्रा. किरण गायकवाड, नितीन कवडे, डॉ. कैलाश अंभुरे, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. भगवान मोगल आदी उपस्थित होते.