‘प्यार के तीन रंग, खून के छींटों के संग’; तापसी पन्नूच्या बोल्ड ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर झाला प्रदर्शित

Haseen Dilruba
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नू हि तिच्या बेधडक आणि हटके स्वभावासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. मात्र कदाचित ती आता बोल्ड लूकसाठी सुद्धा ओळखली जाऊ शकते.तिचा आगामी थ्रिलर चित्रपट ‘हसीन दिलरूबा’ याचा रंजक ट्रेलर नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये तापसी एकदम बोल्ड लूकमध्ये दिसतेय जशी ती याआधी कधीच दिसली नव्हती आणि म्हणूनच तिच्या या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या तुफान वायरल होत आहे.

https://www.instagram.com/tv/CP991ADKIr4/?utm_source=ig_web_copy_link

आगामी चित्रपट हसीन दिलरुबा हा एक रंजक आणि थ्रिलर कथानक असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्या शिवाय अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेता हर्षवर्धन राणे हे कलाकार देखील अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/CP0QK1lCKAm/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटात जहरी आणि लहरी असे त्रिकोणी प्रेम अर्थात लव्ह ट्रॅन्गल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात तापसी आणि विक्रांत हे दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. हि कथा या दोघांपासून सुरु होईल मात्र याच दरम्यान तापसीच्या आयुष्यात हर्षवर्धन राणेची एन्ट्री होताना दिसेल आणि मग हि कथा अनोख्या वळणांवरून जाताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CPzjxayp7bL/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरूवातीलाच तापसी विक्रांतला प्रश्न करताना दिसते कि, ‘आपने दिनेश पंडित की किताब पढ़ी है..? क्या लिखते हैं, छोटे-छोटे शहरों में बड़े-बड़े कतल करा देते हैं, पता ही नहीं चलता,’. यानंतर तापसीच्या घरात एक मोठा ब्लास्ट होतो आणि यात तिच्या पतीचा मृत्यू होतो. येथून कथा पुढे गौप्यमय आणि अधिक रोमांचक होऊ लागते.

https://www.instagram.com/p/CP2XzFHrVYY/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान अर्थातच पोलिसांचा पहिला संशय तापसीवर जातो आणि मग पुढे…. पुढे काय ..? हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल आणि जुलै महिन्याच्या २ तारखेची वाट पाहावी लागेल. कारण येत्या २ जुलै २०२१ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तूर्तास तरी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडतोय. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.