हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी आमच्यात देशाच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असून देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे असा नारा दोन्ही नेत्यांनी दिला. तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत अस चंद्रशेखर राव यांनी म्हंटल.
आम्ही दोघं भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू असे त्यांनी म्हंटल. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे.देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. असे म्हणत देशातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे असं चंद्रशेखर राव यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत.”