ट्रक चालकानेच पळवले दीड लाखाचे चहा पत्तीचे बॉक्स

MIDC waluj police station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : उभ्या ट्रकमधून 1 लाख 57 हजार 814 रुपये किंमतीचे चहापत्ती चे 24 बॉक्स चोरी झाल्याची घटना रांजणगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात राज्यातील वापी येथून इस्ट वेस्ट रोडलाइंस या ट्रॉन्सपोर्टच्या चालकाने ट्रकमध्ये
(एम.एच.28, बी. बी. 4232) चहापत्तीचे 209 बॉक्स व दुसऱ्या एका ट्रॉन्सपोर्टचे साहित्य भरून औरंगाबादला पोहचवण्याचे सांगितले होते. माल भरल्यानंतर 11 ऑगस्टला सायंकाळी ट्रकचालक विनोद कचरू वावळे (रा.बामणी ता. जिंतुर जि.परभणी) व ट्रक मालकाचा जावई अमोल बोरकर हे दोघे गुजरातहून औरंगाबादला येण्यासाठी निघाले. 13 ऑगस्टला ट्रक वाळूज औद्योगिक क्षेत्रात आल्यानंतर चालक वावळे व त्यांचा सोबत असलेल्या बोरकर यांनी बॅटको कंपनीला मालक खाली करून ट्रक रांजणगाव फाट्यावर थांबविला.

दोघांनी रांजणगाव फाटा येथे आराम करीत दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळगावला पोहोचले. यावेळी चालक वावळे, मी शौचालयाला जाऊन येतो म्हणून निघून गेले. यावेळी बोरकर हे ट्रकमधील चहापत्तीचे बॉक्स खाली करू लागल्यानंतर त्यांना 24 चहापत्तीचे बॉक्स गायब असल्याचे दिसून आले. बोरकर यांनी चालक वावळे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद आढळून आला. तसे तो परतही न आल्याने हे बॉक्स नेल्याचा संशय बोरकर यांनी व्यक्त केला. याप्रकरणी चालक विनोद वावळे यांच्याविरुद्ध एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.