Satara Crime : कराड प्रांत कार्यालयात लाच घेताना दोघे रंगेहात सापडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे.येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70 वर्षे, नोकरी –  लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा प्र फीस कराड) या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघाकरिता प्रत्येकी 10 हजार रूपयांची मागणी करून असे 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात सापडले.

येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकरी यांचेकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध कार्यालयात पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. त्या प्रतिज्ञापत्रात मूल्यांकन प्रक्रिये बाबत पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय येथे गेले असता, त्यांना आरोपी लोकसेवक एक व दोन यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, स. पो. उप. नि. शंकर सावंत, पो.ना.निलेश राजपूरे, पो.शि. विक्रमसिंह कणसे यांनी सापळा रचून केली.