सरसकट लाॅकडाऊन म्हणजे मोगलाईच ः आ. शिवेंद्रसिंहराजे जिल्हा प्रशासनावर कडाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्ह्यात सरसकट बंद म्हणजे मुगलाई आहे. व्यापारी थांबायला तयार नाही. निर्णय बदलला पाहिजे, अन्यथा लोकांच्यात उद्रेक होईल. रस्त्यांवर विक्री करतायत त्याला परवानगी मग दुकानदारांना का बंदी असा प्रश्न करत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा प्रशासनावर चांगलेच कडाडले.

आ. भोसले म्हणाले, जिल्हा प्रशासन विश्वासात न घेता निर्णय घेत आहे. आफिसमध्ये बसून निर्णय घेत आहेत. तो राबवायचा त्यामुळे लोकांच्यात नाराजी होवू शकते.  मी पालकमंत्र्यांशी बोलेन. जिल्हा प्रशासनाने फेरविचार करावा. जास्तीत जास्त काय होईल तर १४४ कायदा मोडले म्हणून जेलमध्ये बसावे लागेल. धंदा बंद करून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेले चांगलं.

मंगळवारी सकाळी शहरातील व्यापारी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काढलेल्या आदेशाच्या विरोधात रस्त्यांवर उतरलेले होते.  तसेच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाच्या विरूध्द पवित्रा घेतली. वीकेंड लाॅकडाऊनला आमचे सहकार्य राहणार असून सरकारचा निर्णय एक तसेच जिल्हा प्रशासनाचा दुसरा आदेश आहे. यामुळे आम्ही व्यापार करायचा कि नाही. आमचे जगणं यामुळे कठिण होईल असे ग्राहणे व्यापाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मांडले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment