लग्नाचे आमिष दाखवून नर्सवर अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | लग्नाचे आमिष दाखवून विधवा परिचारिकेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेने नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून प्रकरण तपास करण्यासाठी मुकुंदवाडी पोलिसांकडे वर्ग केले आहे. हबिब महेबुब शेख (वय 30) राहणार (जालना )असे आरोपीचे नाव आहे. पीडिता तिच्या मुलीसह राहात असताना तिच्या पतीचे निधन झाले. दरम्यान, तिची आरोपी सोबत ओळख झाली त्याने तिच्या सोबत जवळीक वाढविली.

23 ऑक्टोंबर 2019 रोजी सर्वप्रथम तो तिला सिडको बस स्थानक परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला .तेथे त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्यांनी तिच्यावर तिच्या घरी जाऊन अत्याचार केला. तिने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली असता वेळोवेळी कारणे सांगून तो टाळाटाळ करीत असे.

ती नोकरी निमित्त मुंबईत राहायला गेली. तेव्हा त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे तिला समजले. नेरूळ एमटीडीसीच्या लॉजवर नेऊन ब्लॅकमेलिंग करीत त्याने तिच्या सोबत बळजबरी केली. आणि तिच्या सोबत त्याने अश्लील छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. या प्रकाराला वैतागलेल्या पीडितेने आपली फसवणूक आणि अत्याचार केल्याची तक्रार .मुंबईतील वाशी ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत हा गुन्हा तपासासाठी औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केला मुकुंदवाडी ठाण्यातील फौजदार आर. के. बांगर अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment