पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये काल दुपारी एक विचित्र घटना घडली. यामध्ये आपली बायको नांदायला येत नाही म्हणून कुरकुंडी येथील एका युवकाने चक्क टॉवरवर चढून (young man climbed the tower) शोले स्टाईल आंदोलन केले. केशव काळे असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. यावेळी जोपर्यंत पत्नी बरोबर येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने उपस्थितांना सांगितले. त्याने आपल्यासोबत एक दोरीही नेली होती. या आंदोनलामुळे प्रशासनाची जोरदार तारांबळ उडाली होती. अखेर शेवटी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर हा तरुण टॉवरवरून (young man climbed the tower)खाली उतरला.
बायको नांदायला येत नाही, म्हणून पट्ट्याचे चक्क टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन pic.twitter.com/pZAcncpKzF
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 20, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
केशव काळे या युवकाचे गोद्रे येथील मुलीसोबत डिसेंबर २०२१ मध्ये कुरकुंडी घारगाव येथे विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये सतत होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी माहेरी आपल्या आईवडिलांकडे राहत होती. गुरुवारी हा युवक तिला सासरी नांदण्याकरीता घेऊन जाण्यास आला असता पत्नीने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर केशव काळे हा युवक थेट टॉवरवर चढला.
या तरुणाची बायको नांदायला येत नसल्याने त्याने शक्कल लढवत शोले स्टाईल आंदोलन केले. त्याने आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून थेट पिंपळगाव सिध्दनाथ गावातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून (young man climbed the tower) हा ड्रमा केला. या घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो खाली उतरला.
हे पण वाचा :
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार
…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर
अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं