अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर आता राज ठाकरे… ; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मनसे नेते राज ठाकरे यांनी आपला 5 जून रोजीचा अयोध्येचा दौरा स्थगित करत असल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले. यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्याकडून निशाणा साधण्यात आला. त्यानंतर आता मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. “अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर मला भीती वाटते की राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दाच सोडून देतात की काय? असे म्हणत निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली

संजय निरुपम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आतापर्यंत राज ठाकरे आपण अयोध्येचा दौरा करणार असल्याचे जाहीरपणे सांगत होते. मात्र, आज अचानकपणे त्यांनी दौरा स्थगित केला असल्याचे सांगितले. त्याच्या दौऱ्याच्या स्थगितीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. मात्र, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे असला तरी भीती आहे की ते आता हिंदुत्वाचा मुद्दा सोडून तर देत नाही ना. कारण ते लाऊडस्पिकरच्या मदतीने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आले होते ते हिंदुत्व नाहीच.

राज ठाकरेंचा भोंग्याचा कार्यक्रमाचा सूत्रधार वेगळाच

यावेळी निरुपम यांनी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा जो मुद्दा घेतला होता. त्यावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंचा भोंग्याचा कार्यक्रम विनाकारण दोन समाजात भांडण लावण्याचा होता. या कार्यक्रमामागे राज जरी असले तरी कोणाच्या तरी सांगण्यावरून ते भांडण लावत होते, असेही यावेळी निरुपम यांनी म्हंटले.

Leave a Comment