Ajab Gajab : ‘या’ गावातील महिला 5 दिवस कपडे घालत नाहीत; कारण वाचून व्हाल हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जग आधुनिक युगात जगत आहे. भारत देखील एक विकसनशील राष्ट्र म्हणून समोर आला आहे. असे असले तरी भारतात आजही अजीबोगरीब परंपरा पुढे नेल्या जात आहेत. आजच्या काळात देखील ह्या परंपरा पाळल्या जात आहेत आणि लोकांचा ह्या गोष्टींवरचा विश्वास आणखी कायम आहे. आपण भारतातील अश्याच एका विचित्र परंपरेबद्दल चर्चा करणार आहोत. ज्या परंपरे अंतर्गत गावातील महिलांना पुर्ण पाच दिवस निर्वस्त्र राहावे लागते. म्हणजेच संपूर्ण ५ दिवस या गावातील महिला अंगावर कोणतेही कपडे घालत नाहीत. यामागे नेमकं काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

श्रावण महिन्यातील 5 दिवस पाळली जाते ही परंपरा

हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटी भागामध्ये असलेल्या पिंनी गावामध्ये मधील श्रावण महिन्यात महिला पुर्ण पाच दिवस निर्वस्त्र राहण्याची परंपरा आहे. गावात ही परंपरा अनेक वर्षांपासून पार पाडली जाते. पिंनी गावात ज्या महिला श्रावण महिन्यातली परंपरेचा भाग होत नाही. त्या महिलेबाबतीत किंवा तिच्या परिवाराबाबत काही वाईट घटना घडल्याच्या बातम्या कानावर येतात असे गावकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे गावात आजही ह्या परंपरेला विरोध केलेलं दिसत नाही.

पुरुष देखील आहेत ह्या परंपरेचा भाग

गावात पार पडल्या जाणाऱ्या परंपरेचा गावातील पुरुषांना देखील भाग व्हावे लागते. ज्या अंतर्गत गावातील पुरुष्यांना आपल्या पत्नीशी बोलणे बंद करुन त्याच्या पासून दूर जाऊन राहावे लागते. या काळात पुरुष्यांना दारू आणि मांसाहाराचे सेवन करण्यास पूर्णपणे बंदी आहे. महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील ह्या प्रथेचा भाग होणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास ज्या देवी देवतासाठी ही प्रथा पाळली जाते ते क्रोधित होतात असा समज गावकऱ्यांमध्ये आहे.

काय आहे यामागील पौराणिक कथा

पूर्वी गावात सुंदर वस्त्र घालणाऱ्या महिलांना राक्षस येऊन घेऊन जायचे व त्यांच्यावर अत्याचार केला जायचा . तेव्हा गावात ” “लहुआ घोंड ” नावाच्या देवतेने येऊन गावातील महिलांचे राक्षसांपासून रक्षण केले. तेव्हा पासून ह्या परंपरेला सुरुवात झाली असे सांगण्यात येते. तेव्हापासून आजपर्यंत हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटीतील पिंनी गावात ही परंपरा पार पाडली जाते.