महात्मा गांधींविषयीची ‘ही’ मनोरंजक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर नक्की वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या सोमवारी म्हणजेच 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 जयंती साजरी करण्यात येईल. महात्मा गांधी यांची जयंती हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. आपला भारत देश हा  गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गांमुळेच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर वाढावा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात यावे यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी यांच्याविषयी अशी अनेक तथ्ये आहेत जी आजवर लोकांना माहीत नाहीयेत, आजच्या लेखात आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.

महात्मा गांधी यांच्या विषयीची मनोरंजक तथ्ये

1) महात्मा गांधीजी हे शाळेमध्ये इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेले एक हुशार विद्यार्थी होते. त्यांनी गणित विषयावर देखील प्रभुत्व मिळवले होते. मात्र त्यांचा भूगोल हा विषय कमकुवत होता. महात्मा गांधी यांचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते.

2) महात्मा गांधी हे जेव्हा बिहार येथे गेले असता त्यांच्या लक्षात आले की निरक्षरतेमुळे लोकांचे हाल होत आहेत. यानंतर त्यांनी त्याठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या शाळेत महात्मा गांधींनी काही दिवस विद्यार्थ्यांना शिकवले. आजही शाळा पूर्वी चंपारणच्या ढाका ब्लॉकच्या बरहरवा येथे वसलेली आहे.

3) महात्मा गांधी हे कधीही अमेरिकेला गेलेले नाहीयेत किंवा त्यांनी विमानात प्रवास देखील केलेला नाहीये. त्यांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात आवडत नव्हता. त्यांनी जेव्हा कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा त्यांची पहिली केस हरली होती. महात्मा गांधी हे त्यांचे नकली दात त्यांच्या धोतरात बांधून ठेवायचे आणि जेवण करायच्या वेळीच त्याचा वापर करायचे.

4) श्रवणकुमारची कथा आणि हरिश्चंद्र यांचे नाटक पाहून महात्मा गांधी खूप प्रभावित झाले होते. महात्मा गांधी यांना 1930 मध्ये अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने “मॅन ऑफ द इयर”चा किताब दिला होता. इतकेच नव्हे तर, त्यांनी 1934 मध्ये भागलपूरमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या ऑटोग्राफसाठी 5 रुपये आकारले होते.

5) सर्वात पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले होते. त्यांनी 4 जून 1944 रोजी सिंगापूर रेडिओवरून संदेश प्रसारित करताना महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. महात्मा गांधी यांना 5 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित मिळाले होते. परंतु पुरस्कार मिळण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली.

6) रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली होती. मुख्य म्हणजे, भारतातील एकूण 53 मोठ्या रस्त्यांना महात्मा गांधींचे नाव देण्यात आले आहेत. देशातच नाही तर परदेशातही एकूण 48 रस्त्यांना महात्मा गांधींचे नाव देण्यात आले आहेत.

7) महात्मा गांधी यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी  स्वातंत्र्य दिवस 24 तास उपोषण करून साजरा केला होता. 15 ऑगस्ट रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या उत्सवात ते नव्हते. त्यावेळी ते बंगालमधील नोआखली येथे हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीय हिंसाचाराच्या विरोधात उपोषण करत होते.

8) महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रेत सुमारे 10 लाख पेक्षा जास्त लोक चालत होते. तर 15 लाखांहून अधिक लोक वाटेत उभे होते. महात्मा गांधी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केली होते.