नोकरदार वर्गाने ‘इथे’ करा गुंतवणूक; टॅक्सही वाचेल आणि ज्यादा रिटर्न्सही मिळतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हालाही कंपनीकडून आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन फॉर्म मिळाला असेल. यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेत किती गुंतवणूक केली आहे हे यात सांगितले जाते. याच्या च आधारे किती TDS (Tax Calculation) कापून घ्यायचा हे कंपनी ठरवते.

जर तुम्ही अजूनही गुंतवणूक केली नसेल तर आता 31 मार्चपर्यंत करू शकता. बहुतेक लोकं अशा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामध्ये चांगल्या रिटर्नसह टॅक्स सूट देखील मिळते आणि धोकाही कमी असतो. गुंतवणुकीचे असे काही मार्ग आहेत, जिथे पैसे गुंतवून तुम्ही रिटर्न मिळवू शकता आणि टॅक्स वाचवू शकता.

5 वर्षांच्या FD वर टॅक्स बचत
BPN Fincap चे संचालक AK निगम यांच्या मते, 5 वर्षांच्या FD वर कर सवलत मिळवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुमचे बँकेकडे kyc असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारेही FD उघडू शकता. नेटबँकिंगद्वारे पेमेंट कधीही ऑटो मोडमध्ये ठेवू नका कारण ते तुमच्या FD चे 5 वर्षांनी रिन्यूअल करू शकते ज्यामुळे मुदतपूर्तीचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. FD वर मिळणारे व्याज कमाईमध्ये येते, त्यामुळे त्यावर टॅक्स लागू होईल. जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.

टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी
टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटवर टॅक्स सूट मिळू शकते. ही पॉलिसी मर्यादित कालावधीसाठी आहे, ज्याचा प्रीमियम खूपच कमी आहे. पॉलिसी धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, आयकर कलम 10(10D) अंतर्गत क्लेमच्या रकमेवर 100% सूट उपलब्ध आहे. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतचा आयुर्विमा प्रीमियम सवलतीसाठी पात्र आहे.

होम लोनची मूळ रकमेवर कर सवलत
प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनच्या मूळ रकमेवर 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळू शकते. याशिवाय, होम लोनच्या व्याजावर कलम 24(बी) अंतर्गत दरवर्षी 2 लाख रुपयांची सूट आहे. अशा प्रकारे होम लोन तुम्हाला 3.5 लाख रुपयांची कर बचत देते.

मुलांच्या शिक्षणावर टॅक्स बेनिफिट
मुलांच्या शिक्षणावरील खर्चात तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. मात्र, हे केवळ शुल्कासाठी आहे आणि कलम 80C अंतर्गत सूट उपलब्ध आहे. हा फायदा केवळ ट्यूशन फीसाठी आहे आणि मुलांच्या प्रवेशासारख्या मोठ्या खर्चासाठी नाही. ही कर सवलत फक्त मुलांच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाच्या फीसाठी उपलब्ध आहे. परदेशात शिकणाऱ्या मुलाचे शिक्षण शुल्क करमुक्त नाही आणि ते फक्त दोन मुलांपुरते मर्यादित आहे.

इन्शुरन्स प्रीमियम प्लॅन
इन्शुरन्स योजना विकत घेतल्यावरही कर सवलतीचा लाभ मिळतो. एंडोमेंट प्लॅन, होल लाइफ प्लॅन, मनी बॅक, टर्म इन्शुरन्स आणि युलिप यांसारख्या पॉलिसी खरेदी करून टाकं वाचवू शकतो. या पॉलिसींच्या प्रीमियमचा भरणा केल्यावर, 80C अंतर्गत लाभ एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे लाइफ इन्शुरन्समध्ये एन्युइटी प्लॅन घेतल्यासही टॅक्समध्ये सूट मिळू शकते.

Leave a Comment