हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री दीया मिर्झा प्रेग्नंट असल्यापासून आजकाल अतिशय चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रीय असते. चाहत्यांच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिया नेहमीच दिलखुलासपणे देत. यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यात बराच रस असतो. नुकताच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत ती मेडिटेशिनचे महत्व सांगतेय. मात्र याहीपेक्षा अधिक जर काही लक्ष वेधून घेत असेल तर ते आहे या फोटोत तिच्या अंगा-चेहऱ्यावर दिसणाऱ्या जखमा. यामुळे तिचे चाहते अतिशय चिंतेत पडले होते. मात्र याबाबत खुलासा करत दिल्याने चाहत्यांची चिंता मिटवली आहे.
https://www.instagram.com/p/CPIRvfEjYtV/?utm_source=ig_web_copy_link
हा फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी मेडिशनवर लिहीलेल्या पोस्टवर नव्हे तर तिच्या अंगावर उमटलेल्या जखमांवर अधिक लक्ष दिले आहे. शेअर केलेल्या फोटोत दीयाची झालेली अवस्था पाहून तिच्या चाहत्यांनी व्याकुळ होत तिच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दीयाच्या हातावरच्या आणि चेहऱ्यावरच्या जखमा पाहून तिचे चाहते तिची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली असे प्रश्न काळजीने विचारू लागले. हा फोटो पाहिल्यावर लक्षात येते कि खरोखरच दियाच्या पोस्टपेक्षा तिच्या शरीरावरील जखमा जास्त लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा वायरल झाला आहे.
https://www.instagram.com/p/CNIATcpjlOt/?utm_source=ig_web_copy_link
अखेर हा फोटो पाहून चिंतेत पडलेल्या चाहत्यांना दिलासा देण्यासाठी दीयाने या फोटोमागील सत्य सांगितले. २०१९ सालामध्ये ‘काफिर’ वेब सीरिज रिलीज झाली होती. त्या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यानचा हा फोटो आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी काळजीचा प्रश्न झालेला दीया मिर्झाचा हा फोटो आत्ताचा नसून साधारण एक वर्ष जुना आहे. तसेच तिच्या या जखमा खऱ्या नसून मेकअप आहे अर्थात त्या खोट्या जखमा आहेत. याबाबत तिने स्वतःच याच फोटोच्या कॅप्शनमध्ये बदल करीत खुलासा केल्यामुळे तिच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. दिया प्रेग्नंसीदरम्यान नित्यनियमाने योगा करते. त्यामुळे तिची आणि बाळाची प्रकृती अतिशय उत्तम असून दोघेही आनंदी आहेत, अशी माहिती मिळत आहे.