पत्नी माहेरहून येत नसल्याने तरुणाने घेतला आईच्या साडीने गळफास; WhatsApp वर ठेवला ‘हा’ स्टेटस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । वादानंतर माहेरी गेलेली पत्नी 20 दिवसानंतरही परत येत नसल्याच्या नैराश्यातून 25 वर्षीय पतीने व्हाट्सएपवर स्टेटस ठेऊन आईच्या साडीने छताच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी पडेगाव येथील सुंदरनगर भागात समोर आली. गणेश पोपटराव वराळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेली अधिक माहिती अशी की, मृत गणेश आणि त्याच्या पत्नीमध्ये सुमारे 20 दिवसांपूर्वी घरघुती वाद झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती. गणेशने अनेकवेळा विनवणी केली. मात्र ती परत आली नाही. यामुळे गणेश गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. गणेशचे वडील वॉचमेन आहेत. ते रात्री नाईट ड्युटी साठी गेले होते. तर आई जम्मू कश्मीर येथ वैष्णोदेवी देवदर्शनाला गेली आहे. घरी गणेश आणि त्याचा लहानाभाऊ दोघेच होते.

शनिवार असल्याने भाऊ सकाळीच उठला होता. गणेशाला देखील त्याने झोपेतून उठवले. दोन्ही भावानी सोबत चहा घेतला आणि तो खुलताबादला निघून गेला. गणेश घरी एकटाच होता. वडील नाईट ड्युटी संपवून घरी आले तेंव्हा गणेशने हॉल मधील पंख्याच्या हुकाला आईच्या साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसले.

वडिलांनी हंबरडा फोडताच शेजाऱ्यांनी धाव घेत पोलिसांच्या मदतीने गणेशला फासावरून खाली उतरवून रुग्णालयात हलविले. मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गुड मॉर्निंग! दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात. व ‘मन’ होना चाहीये किसींको याद करणे के लिये, वक्त आपणे आप मिलही जाता है. अशा प्रकारे व्हाट्सएपवर विविध स्टेटस ठेवले व त्यानंतर गणेशने टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केली.

Leave a Comment