शहरातील सिडको चौकात ट्रकने तरुणाला चिरडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. सिडको चौकात झालेल्या भीषण अपघातात तरुण ठार झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. रोहित दिनकर नरवडे (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण रमानगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

सिडको चौकातून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे दुचाकीवरुन जात होता. जवळून गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक जात होता. अचानक दुचाकी घसरल्याने रोहित नरवडे खाली पडला. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर संबंधित ट्रक चालक पसार झाला आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. औरंगाबादेत उड्डाणपूल विकास दिसत आहे. म्हणजे गर्दी वाढली बांधा उड्डाणपूल. पण पुढे काय? शहरवासीयांना वाहतूक नियोजनात सहभागी करुन घेऊन उपाय-योजना करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment