नोकरीचे आमिष दाखवून युवकाला सात लाखाला लुटले

औरंगाबाद : एका बेरोजगार युवकला जिल्हाअधिकारी कार्यालयातील समाज कल्याण विभागात नोकरी लावून देण्यासाठी सात लाख रुपयानी लुटण्याचा चा प्रकार वर्ष 2018 मध्ये घडला होता. या प्रकरणातील फरार आरोपी मधुकर विनायक गायकवाड ( 45, रा. आडुळ, पैठण ) याला तीन वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविला.

रामेश्वर रमेश खरात ( वय) 28, रा. करणखेड, पो. कव्हळ, ता. चिखली, जी. बुलढाणा या युवकांचे बिपीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले होते. त्याला मधुकर गायकवाड आणि अन्य तीन जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाती समाज कल्याण विभागात नौकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रामेश्वर खरात यांनी नौकरी मिळण्यासाठी पैशांची जमवाजमव केली. आणि पैसे दिले. पैसे मिळाल्यानंतर सदरील आरोपीना युवकला फिटनेससाठी घाटी रुग्णालयात नेले होते. या ठिकाणी कागदपत्रे स्वतः जवळ ठेवून तिघे पळून गेले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, रामेश्वर खरात याने सिटीकौक पोलिसी ठाणे गाठून गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पालिसांनी मधुकर गायकवाड यांचा शोध घेणे सुरु केले. पण मधुकर गायकवाड आढळून आला नाही.

सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकला मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर गायकवाड हा झाल्टा परिसरात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसी उपनिरीक्षक आर. एस. जोंधले, साहाय्य फौंजदार नजीर पठाण, पोलिस अंमलदार मिसाळ, होनराव, सचिन घुगे, जायभाये यांनी मधुकर गायकवाड याला ताब्यात घेतले. तीन वर्षानंतर या आरोपीला सिटी चौक पोलीसांनी अटक केली.