जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

0
121
Jayakwadi Damn , Drowing
Jayakwadi Damn , Drowing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला एक युवक धरणात बुडाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आली आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो सापडला नाही.

आदर्श रमेश शिरसाट (रा. भिंगार जि. अहमदनगर) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. आदर्श दोन दिवसापूर्वी नातेवाइकांच्या लग्नासाठी विसरवाडी याठिकाणी आला होता. सोमवारी तो नातेवाईकांसोबत धरण पाहण्यासाठी गेला होता.

धरण पाहण्यासाठी गेला असता त्याला पोहोण्याचा मोह आवरला नाही. पोहण्याची इच्छा झाल्याने त्याने साखळी क्रमांक 114 जवळ पाण्यात उडी घेतली. त्या ठिकाणी जोरदार वारे असल्यामुळे पाण्याच्या लाटा उसळत होत्या त्यामुळे आदर्शला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो धरणात बुडाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here