‘तान्हाजी’ काढल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवप्रेमींकडून थिएटर बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या अजय देवगणची भूमिका असलेला तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात दीडशे कोटीहून अधिक रकमेचा गल्ला जमवलेला तान्हाजी चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांचे जुने विक्रम मोडीत काढत निघाला आहे. तानाजी मालुसरे या शिवाजी महाराजांच्या लढवय्या मावळ्याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही डोक्यावर घेतल्याचं पहायला मिळत आहे.

साताऱ्यातील कराडमध्ये मात्र तुफान फॉर्मात असलेल्या तान्हाजी चित्रपटाचे शो बंद करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला होता. नटराज थिएटरच्या मालकांनी असं पाऊल उचलल्यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी मंगळवारी चित्रपटगृहातील चालू शो बंद पाडले.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणा देत कार्यकर्ते चित्रपटगृहाबाहेर एकत्र जमले होते. तान्हाजी चित्रपटाचे पोस्टर पुन्हा लावत त्यांनी चित्रपट पुन्हा चालू करण्याची सूचना चित्रपटगृहाच्या मालकांना दिली आहे. शिवाजी महाराज हे आमच्यासाठी कायम आदरणीय असून त्यांचा गौरवशाली इतिहास दाखवताना कुणी कमीपणा केला तर आम्ही ते सहन करणार नाही असं कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणानंतर सिनेमागृहात तान्हाजी चित्रपटाचे शो पुन्हा दाखवण्यास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवरून हटवा; गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्देश

सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले गोत्यात

Leave a Comment