साडेसोळा तोळे सोने लंपास : सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातील 5 लाख 81 हजारांच्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव | खटाव तालुक्यातील मायणी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 5 लाख 81 हजार 500 रुपये किमतीच्या साडेसोळा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सरूताई मठाजवळ राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरात ही घटना घडली. या घटनेने मायणीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मायणी येथील मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावरील सरुताई मठाजवळ रहात असलेल्या सौ. सरस्वती तारळेकर (वय- 65) या सेवानिवृत्त शिक्षिका पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी दि. 26 जुलै रोजी गेल्या होत्या. शुक्रवारी दि. 30 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या पुणे येथे असताना त्यांच्या मायणी येथे शेजारी राहणाऱ्या नीलम पाटील यांनी त्यांना घराचे दार उघडे असल्याची माहिती फोन वरुन दिली.

त्यानंतर तारळेकर या पुणे येथून मायणी येथे घरी आल्या. दरम्यान, त्यांना घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. तसेच कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामध्ये ठेवण्यात आलेले तब्बल साडेसोळा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी मायणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास सहाय्यक फौजदार दोलताडे करत आहेत.

Leave a Comment