चोरट्यांनी चोरले शिवमंदिरातील सोन्या चांदीचे दागिने, मात्र दानपेटीला हात लावताच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर आजकाल अनेक चोरीचे (theft) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असताना दिसतात. या व्हिडिओमध्ये चोरट्यांची (theft) चतुराई पाहून अवाक झाल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर काही इतके मजेशीर व्हिडिओ असतात की पोट धरून हसायला लावतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि, दोन चोर चोरी (theft) करण्यासाठी मध्य प्रदेशातील मनुनिया गावातील महादेव मंदिरात येतात. येथील महादेव मंदिराच्या शंकराच्या पिंडीवरील नाग आणि जलकलश चोरतात. मात्र या चोरट्यांची खरी नजर ही दानपेटीवर होती. पण सुदैवाने त्यात त्यांना यश मिळाले नाही. हे चोर दानपेटीला असलेले कुलूप तोडण्याचा खूप प्रयत्न करतात मात्र त्यांना यात यश मिळत नाही.

हे दोन्ही चोर (theft)त्यांचे तोंड संपूर्ण झाकलेले आहे आणि त्यांनी हातामध्ये हात मोजे देखील घातलेले आहे. हा संपूर्ण व्हिडिओ काशिफ काकवी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे मध्य प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी संप पुकारला आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…