जालना । कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर आणि नर्स या कोविड योध्यांचे कवच असलेल्या पीपीई किट, मास्कचा गैरवापरची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन सुरू असताना मध्यरात्री चोरट्यांनी पिपीई किट आणि मास्क बांधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात चोरट्यांनी एका खाजगी कंपनीचे एटीएम आणि बँकिंग ग्राहक सेवा केंद्राचे एटीएम फोड्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन उघडत नसल्याने जवळच असलेल्या समृद्धी ग्राहक सेवा केंद्राचे शटर फोडून 22 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना देखील उघडकीस आली आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने खळबळ उडाली असून चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या प्रकरणी समृद्धी ग्राहक सेवा केद्र संचालकांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”