…तर मी आत्महत्या करेल!! शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर जाचक कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन,” असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते.

राकेश टिकैत यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलनस्थळावरुन शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “मी आत्मसमर्पण करणार नाही. भाजपा याद्वारे काही वेगळंच दाखवू पाहत आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचारासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड समोर आले पाहिजेत. दीप सिंधूबाबत लोकांना माहिती व्हायला हवी. याप्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी”

सरकारने आमची लाईट-पाण्याची सुविधा तोडली आहे. जर गरज पडली तर गावांमधून आणखी लोक येतील. आम्ही गावांतून पाण्याचे टँकर मागवू. जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत,” असंही टिकैत यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment