नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीविषयी काळजीत टाकणारी माहिती देण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली असून, फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती एएनआयने आर्मी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने दिली आहे.
There has been a decline in the medical condition of Former President Pranab Mukherjee as he has developed features of lung infection. He continues to be on ventilatory support & is currently being managed by a team of specialists: Army Research&Referral Hospital,Delhi
(file pic) pic.twitter.com/ZVYVj3kLF6— ANI (@ANI) August 19, 2020
“प्रणव मुखर्जी यांच्यामध्ये फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसत असून प्रकृती बिघडली आहे. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर असून तज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे,” अशी माहिती आर्मी रुग्णालयाने दिली आहे. याआधी याआधी प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली होती. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”