हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या भव्य सोडण्यासाठी संपूर्ण देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. तुम्हाला हे माहित असावे की, अयोध्यात उभारण्यात आलेल्या राम मंदिरात म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली दिव्य आणि अलौकिक रामाची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मुर्ती 51 इंचांची असून या मूर्ती मागे अनेक गूढ रहस्य दडले आहेत. हेच रहस्य आपण जाणून घेणार आहोत.
रामलल्लाच्या मूर्तीत काय आहे खास?
रामलल्लाची ही मूर्ती 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवली गेली आहे. हे बालरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे. या मूर्तीवर विष्णूचे 10 अवतार, ओम, स्वस्तिक, शंख-चक्र आहेत. राम लल्लाच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य देखील करण्यात आला आहे. कारण, राम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म देखील दुपारी 12 वाजता झाला. ज्यावेळी सूर्याची किरणे जास्त प्रखर असतात. आपल्याला श्री रामच्या मूर्तीभोवती रामाचेच एकूण 10 अवतार दिसतील.
रामाच्या मूर्तीवर आहेत ही चिन्हे
श्री राम यांच्या मूर्तीवर मत्स, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि आहेत. तसेच एका बाजूला हनुमान दुसऱ्या बाजूला गरुड विराजमान आहे. या प्रतिमांचे विशेष महत्त्व देखील आहे.
मूर्तीमध्ये यादेखील गोष्टी आहेत
रामलल्लाच्या मूर्तीमध्ये सूर्यदेव आहेत. तसेच, शेषनाग, ओम, गदा, स्वस्तिक, आभा, धनुष्य अशा गोष्टी देखील कोरण्यात आल्या आहेत. रामलल्लाची मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला या मूर्तीत विष्णूचा अवतार देखील दिसेल. तसेच, राजपुत्राची प्रतिमाही पाहिला मिळेल. रामलल्ला यांना गर्भगृहामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान करण्यात येणार आहे. यावेळी कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची 8 फूट असेल. ज्या दगडापासून रामलल्ला यांची मूर्ती बनवण्यात आली आहे ,तो दगड देखील हजारो वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी रामलल्लाची मूर्ती साकारण्यात आली आहे.