साताऱ्याचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सातारा येथील रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत त्यांची तब्बेत व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

छ. उदयनराजे हे दिल्लीला गेले होते तेथून आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या चार दिवसापासून त्यांच्यावर साताऱ्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी जिल्ह्यात तसेच समर्थकांच्यात पसरलेली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी उदयनराजे यांनी सातारा येथे लाॅकडाऊन हटविण्यासाठी कटोरा घेऊन आंदोलन केले होते. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित कमी- जास्त होताना दिसत आहे. जिल्ह्यात 15 आॅगस्टपासून निर्बंध उठविण्यात आले आहेत.

Leave a Comment