मध्यप्रदेश सरकारला कोणताही धोका नाही!- ज्योतिरादित्य सिंधिया

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मध्यप्रदेशात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर प्रतिक्रिया देत, आम्ही सगळे सोबत आहोत, मध्यप्रदेश सरकारला कोणताही धोका नाही असा दावा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे. “ही भाजपाची जुनी सवय आहे, पण ते यामध्ये यशस्वी होणार नाही, आम्ही सर्वजण सोबत आहोत. मध्य प्रदेश सरकारला कोणताही धोका नाही.” असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. भाजपाने सत्ताधाऱ्यांच्या ८ आमदारांना हॉटेलमध्ये कोंडल्याचा दावा करत दिग्विजय सिंह यांनी या आमदारांना २५ ते ३५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला होता.

शेवटी काँग्रेसचे ४, तर मित्रपक्षांचे ४ असे सर्व ८ आमदार गुरुग्राममधील एका मोठ्या हॉटेलमध्ये सापडले. त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपावर राजकीय हल्ला चढवला आहे. मात्र, भाजपाचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here