साताऱ्यात चर्चा एकच : छ. उदयनराजे यांच्या नव्या बीएमडब्लूची

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याचे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या नव्या बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह या कारची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण सोशल मीडियावर छ. उदयनराजे भोसले यांच्या सोबत या गाडीचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर ही नवी कोरी कार ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. छ. उदयनराजे यांच्या सोबत असलेल्या गाडीला नंबर दिसत असून तो लकी एमएच 11 डी डी 007 असा आहे.

साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे पल्सर बाईकसह इनोव्हा, जिप्सी, रेंज रोव्हर, फोर्ड या कंपन्यांच्या अलिशान गाड्या आहेत. छ. उदयनराजे सातारा शहरातून कधी कधी आवडीने फेरफटकाही ते मारतात.

उदयनराजेंच्या या नव्या कोऱ्या एक कोटी रूपयांच्या बीएमडब्लू कार सोबतचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सातारकरांना आता उदयनराजे भोसले ही नवी कार घेऊन केव्हा साताऱ्यात दाखल होणार याची उत्सुकता आहे.

You might also like