औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर्षीही कोरोनामुळे शाळा वेळेत सुरू न झाल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विध्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते, मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा सुरू करण्यात आल्या नाही. वेळत शाळा सुरू करता आल्यामुळे वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होवू शकता. याच कारणाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम या वर्षीच्या शैक्षणिक वर्षा करीत कमी करण्यासाठी शासनाचे विचारविनिमय सुरू होते.
राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेचे संकट असल्याने शासनाने यावर्षी २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विध्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद लवकरच जाहीर होणार आहे.