म्हणून सध्या चौकशीसाठी हजर राहू शकत नाही; अनिल परब यांनी ईडीला दिले ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना इडीची नोटीस आल्यानंतर आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र आपण आज चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचे परब यांनी ईडीला कळवलं आहे. मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही. मला चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता 14 दिवसांची मुदत देण्यात यावी, असं अनिल परब  यांनी ईडीला कळवलं आहे.

मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी.”, असं मंत्री अनिल परब यांनी पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांना नोटीस नेमकी कोणत्या कारणामुळे दिलेली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नोटीशीत चौकशीचं कारण लिहिलं नाही. त्यामुळे चौकशीचं कारण स्पष्ट करावं. कारण मला चौकशीत योग्य माहिती देता येईल.”, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Leave a Comment