मुंबई प्रतिनिधी | देशात तणावाचे वातावरण असल्याने राज्याला देखील याची झालं बसली आहे. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, मात्र सुरक्षायंत्रणेवर ताण येत असल्याने हे अधिवेशन स्थगित करण्याची शक्यता आहे. देशभरात हाय अलर्ट जरी झाल्याने २ मार्च परेंत चालणारे अधिवेशन स्थगित करण्याबाबत च्या निर्णयासंबंधीची बैठक बोलावण्यात आली होती.
मुंबई शहर हाय अलर्टवर असल्याकारणाने सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, यावेळी पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच या बैठकत सर्वपक्षीय नेत्यांना बोलाविण्यात आले होते.
अधिवेशन सुरु असल्याने मुंबई येथे सर्व नेते मंडळी येत असतात. तसेच अनेक या ठिकाणी मोर्चे येत येतात. त्यामुळे सुरक्षेसाठी या ठिकाणी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बरेच महत्वपूर्ण लोक विधानभवन परिसरात एकत्र जमत असल्याने हा परिसर जास्त संवेदनशील होतो. म्हणून सर्वांशी चर्चा करून अधिवेशन संपवण्याबाबतच निर्णय घेण्यात येणार आहे.
इतर महत्वाचे –
‘या’ कारणामुळे आज मंत्रालयासमोर कर्णबधिर तरुणांचे आंदोलन
हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे पायलट निनाद शाहिद