हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट मुंबईत धडक दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधवांच्या साथीने मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहचले आहेत. आज दिवसभर ते आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. मराठा बांधवांच्या प्रचंड संख्येने मुंबई भगवी झाली आहे. मनोज जरांगे यांच्या एका हाकेवर हा संपूर्ण जनसागर लोटला आहे. जरांगे पाटलांवर प्रेम करणारी जनता हीच त्यांची आणि मराठा समाजाची खरी ताकद आहे. एकीकडे जनतेची प्रचंड साथ असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षासह विरोध पक्षाच्या आमदार, खासदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. हे आमदार खास नेमके कोणकोणते आहेत याचीच यादी थोडक्यात जाणून घेऊयात
कोणकोणत्या नेत्यांचा जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा –
ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
राजेश विटेकर – आमदार पाथरी विधानसभा
विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
राजू नवघरे – आमदार- वसमत विधानसभा
डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा
जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ?
1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
दरम्यान, आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आरक्षणाची मागणी आणखी धारधार केली आहे. आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही…. मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.




