हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळा प्रचंड वाढला असून यामध्ये शरीराची काळजी घेणे महत्वाचे असते. यासाठी कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्सच्या ऐवजी नैसर्गिक अन आरोग्यदायी ज्यूस पिणे जास्त फायदेशीर ठरते. बीट, काकडी अन भोपळ्याचे रस हे उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, कारण ते त्वचेला पोषण देतात , त्याचसोबत शरीराला ताजेतवाने ठेवतात. तसेच उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी हे रस पिणे गुणकारक ठरू शकतात. तर चला या रसाचे फायदे जाऊन घेऊयात.
बीट रसाचे फायदे –
बीट हे एक अत्यंत पौष्टिक अन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स, फायबर्स आणि विविध प्रकारचे खनिज असतात, जे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक असतात. बीट रसाचे नियमित सेवन रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, तसेच हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीटमध्ये आढळणारी नायट्रेट्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. यामध्ये असलेला लोह शरीराच्या रक्ताच्या पातळीला सुधारतो.
काकडीचा रस –
काकडी ही एक हायड्रेटिंग आहे, ज्यामध्ये 90% पाणी असते. काकडीच्या रसात कमी कॅलोरी अन भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स असतात. पाणी जास्त प्रमाणात असल्यानं काकडी शरीराला जलतारण पुरवते, तसेच त्वचेला ताजेपणा आणि सौंदर्य देते. तसेच काकडीचा रस पिऊन पचनक्रिया सुधारणार्या मदत मिळते. काकडी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. या कारणामुळे काकडीचे सेवन वजन कमी करण्यास आणि पचन क्रिया सुधारण्यासही फायदेशीर ठरते.
प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी भोपळ्याचा रस –
भोपळा हा एक उत्कृष्ट हायड्रेटिंग अन पौष्टिक आहे. भोपळ्याच्या रसात फायबर्स, अँटीऑक्सिडन्ट्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण खूपच उच्च आहे. भोपळ्याच्या रसात असलेल्या अँटीऑक्सिडन्ट्समुळे त्वचेला ताजेपणाचा अनुभव मिळतो, तसेच ते शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच यात असलेला पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा संतुलन राखतो, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. यामुळे शरीरात ऊर्जा वाढते, आणि थकवा कमी होतो. भोपळ्याचे सेवन प्रतिकारशक्तीला बळकट करते, जे उन्हाळ्यात विविध आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.