हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शुक्रवारी शेअर बाजारात 2023 मधील सर्वात मोठी तेजी मिळाली. ज्यामुळे मागील आठवड्यात झालेले गुंतवणूकदारांचे नुकसान भरून निघण्यास मदत झाली. 3 मार्च रोजी संपलेल्या गेल्या आठवड्यात शेअर बाजार अर्ध्या टक्क्यांनी वाढला आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यात निफ्टी 17,594 वर तर बीएसई सेन्सेक्स 345 अंकांनी वधारून 59,809 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी मिडकॅप 100 तर स्मॉलकॅप 100 अनुक्रमे 2 टक्के आणि 1 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. मात्र या दरम्यान, असे 5 शेअर्स होते ज्यांनी फक्त 5 दिवसांत गुंतवणूकदारांना 43% पेक्षा जास्त रिटर्न मिळवून दिला आहे. चला तर मग या शेअर्सची नावे जाणून घेउयात…
अदानी एंटरप्रायझेस
गेल्या आठवड्यात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सने देखील 42.94% रिटर्न दिला आहे. यावेळी हे शेअर्स 1,314.75 रुपयांवरून 1,879.35 रुपयांवर पोहोचले आहेत. 2.14 लाख कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 42.94% रिटर्न दिला आहे. शुक्रवारी हे शेअर्स 16.97 टक्क्यांच्या वाढीने 1879.35 रुपयांवर बंद झाले. Multibagger Stocks
सूर्यलथा स्पिनिंग मिल्स
गेल्या आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने देखील गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. यावेळी हे शेअर्स 382.65 रुपयांच्या पातळीवरून 535 रुपयांवर पोहोचले आहेत. 228.86 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 39.81% रिटर्न दिला आहे. शुक्रवारी हे शेअर्स 5.25 टक्क्यांच्या वाढीने 535 रुपयांवर बंद झाले. Multibagger Stocks
सोनल मर्कंटाइल
सोनल मर्कंटाइलनेही गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. यावेळी हे शेअर्स 66.35 रुपयांवरून 88.99 रुपयांवर पोहोचले आहेत.129.60 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 34.12 टक्के रिटर्न दिला आहे. शुक्रवारी हे शेअर्स 1.91 टक्क्यांनी वाढून 88.99 रुपयांवर बंद झाला.Multibagger Stocks
मॅक्रोटेक डेव्हलपर्स
मॅक्रोटेक डेव्हलपर्स ही चांगली मार्केट कॅप कंपनी आहे. ज्याची मार्केट कॅप सध्या 49,673.12 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या आठवड्यात 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअर्सने 43.30 टक्क्यांनी उसळी घेतली. तसेच गेल्या 5 दिवसांत हे शेअर्स 719.55 रुपयांवरून 1031.10 रुपयांवर पोहोचले. गेल्या शुक्रवारी ते 2.65 टक्क्यांच्या वाढीने 1031.10 रुपयांवर बंद झाले. Multibagger Stocks
आदर्श प्लांट
गेल्या आठवड्यात या शेअर्सने देखील गुंतवणूकदारांना मोठा नफा कमाऊन दिला आहे. यावेळी कंपनीचे शेअर्स 15 रुपयांवरून 21.47 रुपयांवर पोहोचले आहेत. अशा प्रकारे, या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 43.13% रिटर्न दिला आहे. 20.93 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सची गेल्या 5 दिवसांत 43.13% रिटर्न दिला आहे. शुक्रवारी हे शेअर्स 4.38 टक्क्यांनी वाढून 21.47 रुपयांवर बंद झाले.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=ADANIENT
हे पण वाचा :
Reels बनवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! Facebook ने वाढवली व्हिडिओच्या वेळेची मर्यादा
SBI च्या ग्राहकांसाठी मोठा नफा मिळवण्याची संधी, आता ‘या’ FD वर मिळणार 7.9% व्याज
Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
धक्कादायक !!! American Airlines च्या विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघवी
खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया