Bank Loan : आता ‘या’ बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. अशातच आता इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) आपल्या सर्व मुदतीच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी आणि बँक ऑफ बडोदाने (BoB)आपल्या सर्व कालावधीच्या MCLR मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. या बँकांचे हे नवीन दर अनुक्रमे 15 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

Indian Overseas Bank hikes MCLR by 15-35 bps, RLLR revised too; EMIs may  rise | Mint

BoB च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आता एका वर्षासाठी MCLR 8.5 टक्क्यांवरून 8.55 टक्के तसेच एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR अनुक्रमे 7.9 टक्के, 8.2 टक्के आणि 8.3 टक्के असेल.

त्याच वेळी IOB बँकेने एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 8.30 टक्क्यांवरून 8.45 टक्के केला आहे. त्याचप्रमाणे एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.9 टक्के, 8.2 टक्के आणि 8.35 टक्के तर एक दिवस, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. Bank Loan

Bank of Baroda sees loan growth of 7-10 per cent in FY22 | The Financial  Express

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील. Bank Loan

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. Bank Loan

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank Loan

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/lending-benchmark-rate

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे