स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी संधी चालून आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कर्मचारीवर्गासाठी ४,७०० घरांसाठी म्हाडाची विशेष लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. उपनगरीय माहुल परिसरात या घरांचे बांधकाम झाले असून, अवघ्या १२ लाख ६० हजार रुपयांत हे घर उपलब्ध होणार आहे.
BMC कर्मचार्यांसाठी परवडणारी घरे
मुंबई महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना खास तयार करण्यात आली आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात आपले हक्काचे घर असावे, ही इच्छा या लॉटरीमुळे पूर्ण होऊ शकते. सोमवारपासून या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे.
माहुलमध्ये बांधली ४,७०० घरे, आवश्यक सुविधा उपलब्ध
घरांची किंमत: १२.६० लाख रुपये
एकूण घरे: ४,७००
लोकेशन: माहुल, मुंबई
सुविधा: शाळा, रुग्णालय, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध
ही घरे पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA)विविध विकास प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या कुटुंबांसाठी तयार केली होती. नंतर ही घरे BMC कडे हस्तांतरित करण्यात आली आणि आता ती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया सुरू – कसा कराल अर्ज?
म्हाडाच्या घर खरेदी लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्यास इच्छुक BMC कर्मचाऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करावा.
घर खरेदी केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत विक्री करता येणार नाही. यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर घर खरेदी करण्यास उत्सुक आहेत. मुंबईत स्वतःचे घर घेणे हे अनेक कर्मचाऱ्यांचे स्वप्न असते. मात्र, महागड्या घरांच्या किमतीमुळे ते शक्य होत नाही. BMC व म्हाडाने आता कर्मचारीवर्गासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही BMC कर्मचारी असाल किंवा ओळखीतील कोणी असेल, तर त्यांना या संधीची माहिती नक्की द्या! स्वतःचे हक्काचे घर मिळवण्याची सुवर्णसंधी हुकवू नका!