Sunday, June 4, 2023

‘या’ औषधांचा यापुढे कोविडच्या उपचारात वापर केला जाणार नाही, काही चाचण्या देखील केल्या बंद

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना व्हायरस रूग्णांच्या काळजीसाठी सर्व प्रकारची औषधे वापरण्यास नकार दिला आहे. आता असीम्प्टोमॅटिक आणि सौम्य कोविड प्रकरणांसाठी फक्त ताप आणि सर्दीसाठीचे औषध दिले जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS) ने कोविड संबंधित उर्वरित सर्व नियामक मार्गदर्शक तत्वे पाळण्यास सांगितले आहे. म्हणजेच मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, हात धुणे आणि थुंकणे तसेच शिंकणे यासारख्या सर्व गोष्टींचे पालन असीम्प्टोमॅटिक, सौम्य आणि तीव्र लक्षणांमध्ये करावे लागेल.

कोणते औषध वापरले जाणार नाही
DGHS ने 27 मे रोजी जारी केलेल्या आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, सौम्य लक्षणे आणि असीम्प्टोमॅटिक रोग्यांना दिली जाणारी सर्व औषधे प्रतिबंधित केली आहेत. या औषधांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, इव्हर्मेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, झिंक, मल्टीव्हिटॅमिन इत्यादींचा समावेश आहे. डॉक्टरांना सांगण्यात आले आहे की, ज्यामध्ये सीटी स्कॅनसारख्या चाचण्या आहेत अशा अनावश्यक चाचण्या करू नयेत. सौम्य लक्षणात्मक प्रकरणांमध्ये, मार्गदर्शक तत्त्वे अशी आहेत की, रुग्णाला स्वतःचा ताप, श्वास लागणे, ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO2) किंवा इतर कोणत्याही समस्येचे परीक्षण केले पाहिजे.

असे देखील म्हटले गेले आहे की,” लोकं दिसून येणारी लक्षणे दूर करण्यासाठी अँटीपायरेटिक्स (तापा साठी) आणि अँटीट्यूसिव्हस (सर्दीसाठी) घेतात आणि खोकल्या पासून मुक्त होण्यासाठी दिवसातून दोनदा 800 मिलीग्रॅम बुडेसोनाइड इनहेलरसह घेतात. याशिवाय इतर कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही. लक्षणे वाढत आहेत की कमी होत आहेत यावरून नंतर रुग्णाची तपासणी केली जाऊ शकते. असीम्प्टोमॅटिक प्रकरणांमध्ये कोणत्याही औषधाची आवश्यकता नसतानाही, ज्यांना पूर्वीपासून अस्तित्वातील रोग आहे, त्यांची आधीपासूनच सुरु असलेली औषधे घेऊ शकतात. कोविडची लक्षणे दिसून येणाऱ्यानी निरोगी आणि संतुलित आहार घ्यावा आणि त्यांना भरपूर पाणी पिऊ द्यावे असा सल्ला DGHS ने दिला आहे.

रेमडेसिविरच्या वापरासाठीची मार्गदर्शक तत्त्वे

1. फक्त कोविडच्या रूग्णालयात दाखल झालेल्या तीव्र आणि गंभीर रूग्णांवरच रेमडेसिविरचा वापर केला जाईल. तसेच, आजारानंतर 10 दिवस ऑक्सिजनवर ठेवता येईल.

2. हे अशा रूग्णांसाठी असणार नाही ज्यांना सौम्य लक्षणे आहेत आणि ज्यांचा घरी किंवा कोविड केअर येथे उपचार चालू आहे.

3. केवळ वरिष्ठ डॉक्टर किंवा तज्ञ, जो थेट रुग्णाच्या केअरमध्ये सामील असतो तोच हे औषध लिहून देऊ शकेल.

4. जर अशी परिस्थिती उद्भवली असेल की हे औषध कोणत्याही वरिष्ठांच्या उपस्थितीशिवाय द्यावे लागेल, तर यासाठी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना फोन वरून वरिष्ठ डॉक्टर किंवा तज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल.

अत्यंत गंभीर आणि गंभीर आजारी रूग्णांसाठी tocilizumab च्या वापरासाठीची मार्गदर्शक तत्त्वे

1. ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करूनही जर रुग्णामध्ये 24–48 तासांत कोणतीही सुधारणा दिसून येत नसेल तर स्टेरॉइड tocilizumab दिले जाऊ शकते.

2. जर एखाद्या रूग्णात इन्फ्लामेंट्री मार्कर्स (C-Reactive Protein≥75 mg/L) मध्ये जास्त वाढ होत असेल तर औषध त्याला दिले जाऊ शकते.

3. तथापि, जेव्हा tocilizumab ला रुग्णास दिले जाते तेव्हा हे सुनिश्चित करा की, त्याला किंवा तिला कोणत्याही जिवाणू, बुरशी किंवा क्षयरोगाशी संबंधित संक्रमण तर नाही.

स्टेरॉइड्स साठीची मार्गदर्शक तत्त्वे

1. कोविडच्या असीम्प्टोमॅटिक आणि सौम्य लक्षणांमध्ये स्टेरॉइड्स हानिकारक आहेत.

2. फक्त हॉस्पिटलायझेशन, तीव्र, गंभीर आणि अत्यंत गंभीर कोविडच्या बाबतीत स्टेरॉइड्स देण्यात येतील.

3. स्वत: स्टेरॉइड्सच्या वापरणे पूर्णपणे बंदी आहे.

4. हायपरग्लिसेमियाची तक्रार असणाऱ्या रुग्णांना स्टेरॉइड्स दिले तर नियमितपणे त्यांच्या रक्तातील ग्लूकोजच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

रक्त पातळ करण्याऱ्या औषधां साठीची मार्गदर्शक तत्त्व

1. कोविडच्या मध्यम आणि तीव्र प्रकरणांत लो मोलेक्यूलर वेट हिपेरिनचे डोस वापरले जाऊ शकतात.

2. रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्यास ते देऊ नये.

3. लो मोलेक्यूलर वेट हिपेरिन गंभीर प्रकरणांमध्ये वापरले जाऊ शकते.

4. रुग्णांमध्ये तेव्हाच दिला पाहिजे जेव्हा थ्रोम्बोइम्बोलिझम किंवा नसामध्ये रक्त जमा होण्याची चिन्हे दाखवीत असेल तरच उपचारात्मक डोस म्हणजेच उपचार म्हणून दिले जावे.

हाय रिझोल्यूशन सीटी (एचआरसीटी) स्कॅन मार्गदर्शक तत्त्वे

1. कोविडच्या असीम्प्टोमॅटिक रूग्णांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश एचआरसीटी अहवालात असामान्यता दिसते, परंतु ही लक्षणे पुढे वाढत नाहीत.

2. कोविडच्या संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात छातीचा एचआरसीटी, हा फुफ्फुसात पसरलेला दिसू शकतो, त्यामुळे ती एक चुकीची कल्पना देखील देते.

3. मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, फुफ्फुसांचा एक मोठा भाग असलेल्या तरुणांमध्ये हायपोक्सिया विकसित होणार नाही, तर फुफ्फुसांचा एक छोटासा भाग असलेल्या वृद्धांमध्येही हायपोक्सिया होऊ शकतो.

4. वारंवार एचआरसीटी करण्याने किरणोत्सर्गामुळे नंतर कर्करोगाचा धोका संभवतो.