‘या’ 5 शाकाहारी पदार्थांमधून मिळते भरपूर कॅल्शिअम; आजच आहारात करा समावेश

Calcium food
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या हाडांसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. कॅल्शियममुळेच आपल्या हाडांमध्ये कठीणपणा प्राप्त होतो. आणि ते जास्त दणकट होतात. त्याचप्रमाणे आपल्या हृदयाचे फंक्शन यांसारखे कार्य व्यवस्थित होण्यासाठी देखील कॅल्शियमचा आहारात समावेश असणे खूप गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्तदाब आणि हार्मोन्स इत्यादी गोष्टी बॅलन्स करण्यासाठी देखील कॅल्शियम गरजेचे असते. आपल्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली, तर आरोग्य संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. आपण कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी असे काही पदार्थ खाणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम टिकून राहते आणि वाढते देखील. अनेकवेळा पण असे ऐकले आहे की चिकन मटन यांसारख्या गोष्टींमधून कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळते. परंतु आता आपण काही व्हेज पदार्थ जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम पातळी नियंत्रित राहते. आता हे कोणते पदार्थ आहेत ते आपण जाणून घेऊया.

डेअरी प्रोडक्ट्स

डेअरी प्रॉडक्ट्समध्ये म्हणजेच दही, दूध, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. या पदार्थांचे जर तुम्ही रेग्युलर सेवन केले, तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी देखील नियंत्रित राहील आणि हाडे देखील मजबूत होतील

फोर्टीफाईड अन्न

फोर्टीफाईड अन्नामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियमची मात्रा असते. त्यामुळे जर या पदार्थांचे सेवन तुम्ही केले, तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये जवळपास 100 मिलिग्राम एवढे कॅल्शियम असते. त्यामुळे याचे सेवन करणे गरजेचे आहे.

कडधान्य

कडधान्यांमध्ये देखील जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच विटामिन डी देखील जास्त प्रमाणात असते. तुम्ही जर या कडधान्यांना मोड आल्यानंतर त्याचे सेवन केले, तर यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल. यामध्ये जवळपास 60 मिलीग्राम पेक्षाही जास्त कॅल्शियम असते.

अंजीर

अंजीर हे साधारणपणे ड्रायफ्रूट्समध्ये येतात. अनेक लोक अंजीरचे सेवन करतात. अंजिरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात. दोन अंजीरमध्ये जवळपास 27 मिलीग्राम एवढे कॅल्शियम असते. हे एक नैसर्गिक स्वीटनर आहे. त्याचप्रमाणे रिफाईंड शुगरसाठी देखील अंजीर हे चांगले आहे.

पिकलेली केळी

पिकलेली केळी, पालक यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात. दुधाच्या तुलनेत पिकलेल्या केळीमध्ये जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे पिकलेल्या केळीचे सेवन केल्याने देखील शरीरातील कॅल्शियमची मात्रा वाढते.