आयपीएल जिंकण्याच ‘या’ संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता ; प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. संघात दमदार खेळाडू असूनही सांघिक खेळाच्या कमतरतेमुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे. पंजाबचा संपूर्ण संघ फक्त लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्यावरच अवलंबून दिसत आहे.

पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबकडे सध्या केवळ 2 गुण आहेत. तर त्यांना नेट रन रेटही -0.431 आहे. त्यामुळे आता पंजाबला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जास्त फरकाने जिंकावे लागतील. प्ले ऑफ गाठण्यासाठी संघांना कमीत कमी 16 गुणांची गरज असते.

गुणतालिकेत नजर टाकल्यास 8 गुणांसह सध्या मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दिल्लीचेही 8 गुण आहेत. मात्र नेट रन रेटनं दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, 6 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या आणि कोलकाता नाइट रायडर्स चौथ्या क्रमांकावर आहेत.

ख्रिस गेलंच संघाबाहेर असणं, ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म, मधल्या फळीतील अनुभव नसलेले फलंदाज आणि गोलंदाजांचा खराब फॉर्म ही पंजाबच्या पराभवाची मुख्य कारणे आहेत. आता उर्वरित सामन्यामध्ये पंजाबचा संघ दमदार कामगिरी करून उभारी घेतोय हा हे पाहावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment