गेल्या 5 वर्षात ‘या’ म्युच्युअल फंडांनी दिला आहे उत्कृष्ट परतावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडस् (Mutual funds) हे फंड मॅनेजर्सद्वारे मॅनेज केले जातात. ज्या लोकांना थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा नसते ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करु शकतात. बाजारात असे अनेक म्युच्युअल फंडस् उपलब्ध आहेत जे गुंतवणूकदार लक्ष्य ठरवून, रिस्क फॅक्टर ओळखून आणि मागील रिटर्न विचारात घेतल्यानंतर निवडू शकतात.

गेल्या पाच वर्षांत (9 मार्च 2021 पर्यंत) भारतातील काही परफॉरमिंग म्युच्युअल फंडाकडे एक नजर टाकूयात.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) ही इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगिरी आहे ज्यात गुंतवणूकीवरील आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात फक्त 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. तीन वर्षांच्या सर्वात कमी लॉक-इन कालावधीमुळे हा टॅक्स सेव्ह करण्याचा सर्वात आवडीचा पर्याय आहे.

पैसबाबाजारचे संचालक साहिल अरोरा यांच्या म्हणण्यानुसार कलम 80 सी अंतर्गत कर सवलत ईएलएसएस फंडात उपलब्ध आहे. 3-वर्षांचा लॉक-इन कालावधी गुंतवणूक पर्यायांपैकी सर्वात लहान आहे. अरोरा म्हणतात की, दीर्घ मुदतीच्या रिटर्नच्या बाबतीत ईएलएसएस फिक्स्ड इनकम इंस्ट्रूमेंटपेक्षा चांगले असते. कर बचत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी ईएलएसएस हा एक उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे.

ELSS Funds 5 year Return (Annualised)
1. Mirae Asset Tax Saver Reg Gr 22.50
2. Quant Tax Plan Gr 22.27
3. BOI AXA Tax Advantage Reg Gr 18.59
4. Canara Robeco Equity Taxsaver Reg Gr 18.47
5. JM Tax Gain Gr 18.05

(सोर्स : मॉर्निंगस्टार इंडिया)

लार्ज कॅप फंड
नवीन गुंतवणूकदार सामान्यत: इक्विटी म्युच्युअल फंडाच्या शोधात असतात, ज्यामध्ये जास्त जोखीम न घेता पैसे मिळवता येतात. असे गुंतवणूकदार लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजना खूप मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. सेबीच्या नियमांनुसार, लार्ज कॅप फंड योजनांसाठी टॉप 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या निधीच्या किमान 80 टक्के निधीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

Large Cap Fund 5 year Return (Annualised)
1. Canara Robeco Bluechip Equity Reg Gr 17.69
2. Axis Bluechip Fund Gr 17.51
3. Mirae Asset Large Cap Reg Gr 17.48
4. ICICI Pru Bluechip Gr 15.78
5. HSBC Large Cap Equity Gr 15.60

(सोर्स: Morningstar India)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment