हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेअर बाजारात नेहमीच अविसंगत वातावरण असते . कधी कधी जिथे मोठे शेअर्स विशेष करू शकत नाही तिथे कमी किमतीतले शेअर अगदी कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊन अवाक करतात. आणि त्यासाठी आता मोठे गुंतवणूकदारही लहान लहान शेअरमध्ये गुंतवणूक करून आपापले नशीब आजमावत असतात. आज आपण असेच छोटा पॅकेट बडा धमाका करणारे काही शेअर्स पाहणार आहोत ज्यांनी महिन्याभरातच गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे.
शेअर बाजार कधीच स्थिर नसते तिथे शेअर्सचे दरही कधी स्थिर नसतात . त्यातच काही दिवसांपासून मोठ्या बिग बजेट शेअर्समध्ये संथ गतीने वाढ होताना पाहायला मिळाली. तर काही छोटे शेअर्स रॉकेटच्या वेगाने भर भर वाढत असून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहेत. विशेष म्हणजे हे शेअर 100 रुपयांपेक्षा पण कमी रुपयांचे आहेत. या स्वस्त शेअर्सनी गुंतवणूकदारांना महिन्याभरातच मालामाल केले आहे.
महिन्याभरात छप्परफाड कमाई करणारे काही पेनी शेअर्स पुढील प्रमाणे आहेत.
1) Naturite Agro –
Naturite Agro चा शेअर एक महिन्यांपूर्वी 53.18 रुपयांवर ट्रेड करत होता. आता हा शेअर 134.28 रुपयांवर पोहचला आहे. एकाच महिन्यात या शेअरने 152.50 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला आहे.
2) Prime Industries-
Prime Industries चा शेअर एका महिन्यापूर्वी 24.01 रुपयांवर होता. आता हा शेअर 60.56 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरने एका महिन्यातच 152.23 टक्क्यांची भरारी घेतली. गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
3) Hemadri Cements-
Hemadri Cements हा शेअर एक महिन्यांपूर्वी 8.84 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 22.23 रुपयांवर ट्रेड करत आहे. एका महिन्यातच या शेअरने 151.47 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.
4) Swarna Securitie-
Swarna Securitie चा शेअर एका महिन्यापूर्वी 48.67 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 121.12 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 148.86 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.
5) Vikalp Securitie-
Vikalp Securitie हा शेअर एक महिन्यापूर्वी 7.14 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 17.76 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने एका महिन्यात 148.74 टक्क्यांचा फायदा करुन दिला.
6) Vantage Knowledge-
Vantage Knowledge हा शेअर एक महिन्यापूर्वी शेअर बाजारात 90.73 रुपयांना मिळत होता. आता हा शेअर 220.05 रुपयांवर आहे. एका महिन्यातच या शेअरने गुंतवणूकदारांना 142.53 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.
7) Kapil Cotex –
Kapil Cotex च्या शेअरने पण अशीच कमाल केली. एका महिन्यात हा शेअर 55.50 रुपयांहून 133.19 रुपयांवर पोहचला. एका महिन्यात गुंतवणूकदारांना 139.98 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.