या लोकांनी उन्हाळ्यात उसाचा रस पिणे टाळाच!! अन्यथा आरोग्याचे होईल मोठे नुकसान

sugarcane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मार्च महिना संपत असला तरी उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि या उन्हाच्या तीव्रतेत जास्त प्रमाणात थंडगार पेय पिले जातात. यामध्ये उसाचा रस हा सर्वाधिक पिला जातो. ऊसाच्या रसात कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंक, लोह आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक खनिजे असतात. त्यामुळे तो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. मात्र, काही आरोग्यदृष्ट्या विशेष स्थिती असलेल्या व्यक्तींनी ऊसाचा रस (Sugarcane juice) टाळावा, अन्यथा तो घातक ठरू शकतो.

ऊसाचा रस कसा फायदेशीर?

ऊसाचा रस नैसर्गिकरीत्या गोडसर असतो. त्यात सुमारे १५ टक्के नैसर्गिक साखर असते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तसेच, ऊसाच्या रसातील ‘पॉलीकोसॅनॉल’ नावाचे घटक रक्ताला पातळ ठेवण्यास मदत करतात. तसेच, तो हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरतो.

कोणत्या व्यक्तींनी ऊसाचा रस टाळावा?

  1. डायबिटीज रुग्णांनी – ऊसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तो मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो. एका ग्लासात (२४० मिली) जवळपास ५० ग्रॅम साखर असते, जी सुमारे १२ चमच्यांच्या बरोबरीची असते. ऊसाचा रस ग्लायसेमिक इंडेक्सने (GI) कमी असला तरी त्याचा ग्लायसेमिक लोड (GL) जास्त असतो, त्यामुळे तो रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ऊसाचा रस पिणे टाळावे.
  2. सर्दी-पडसे असलेल्या व्यक्तींनी – ऊसाच्या रसाचा स्वभाव थंड असल्यामुळे तो सर्दी-पडसे असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकतो. ऊसातील ‘पॉलीकोसॅनॉल’ घटकामुळे डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कोणालाही सर्दी, खोकला, ताप, किंवा घशात खवखव असल्यास ऊसाचा रस पिणे टाळावे.
  3. अनिद्राग्रस्त व्यक्तींनी – झोपेच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी ऊसाचा रस पिणे टाळावे, कारण त्यातील काही घटक झोपेच्या चक्रावर परिणाम करू शकतात. तणाव, चिंता आणि
  4. अनिद्रा यांचा सामना करणाऱ्या लोकांनी ऊसाचा रस पिल्यास त्यांच्या झोपेच्या समस्येत अधिक वाढ होऊ शकते.
  5. कोलेस्ट्रॉल वाढलेल्या लोकांनी – शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असल्यास ऊसाचा रस घेणे टाळावे. कारण ऊसातील साखर चयापचय प्रक्रियेदरम्यान शरीरात ‘गुड कोलेस्ट्रॉल’ला ‘बॅड कोलेस्ट्रॉल’मध्ये बदलू शकते. त्यामुळे ऊसाचा रस मोठ्या प्रमाणात घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

ऊसाचा रस प्यायचा की नाही?

आरोग्यदृष्ट्या उत्तम असलेल्या लोकांसाठी ऊसाचा रस फायदेशीर आहे. तो उष्णतेपासून बचाव करतो, शरीराला हायड्रेट ठेवतो आणि त्वरित ऊर्जा देतो. मात्र, मधुमेह, सर्दी-पडसे, अनिद्रा किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेले असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.