हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत देश त्याच्या संस्कृतीमुळे आणि निसर्गरम्य सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळेच विदेशी पर्यटकही भारतात फिरायला येण्यासाठी जास्त पसंती दाखवतात. भारतातील अशी काही खास ठिकाणे आहेत ती सध्या विदेशी पर्यटकांसाठी सर्वात जास्त आकर्षित बनली आहेत. आज आपण याच ठिकाणांविषयी आणि तिथल्या संस्कृतीविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा होईल.
केरळ – केरळ हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. त्यामुळे केरळ पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील लोक येत असतात. केरळमधील मंदिरे निसर्ग, सौंदर्य, खाद्यपदार्थांची खासियत आणि तेथील संस्कृती परदेशी लोकांना जास्त आकर्षित करते. दिवाळीच्या काळामध्ये तर अनेक पर्यटक केरळल जात असतात.
गोवा – आपल्याकडे गोव्याला जाण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, गोव्याला भेट देण्यासाठी सर्वात जास्त फॉरेनर्स येत असतात. आपण सहज जरी गोव्याचे फोटो पाहिले तरी त्या फोटोमध्ये जास्त प्रमाणात फॉरेनर्स दिसून येतात. गोव्यातील बीच, नारळाची झाडे, खाद्य पदार्थ अशा बऱ्याच गोष्टी पाहण्यासाठी फॉरेनर्स गोव्यामध्ये येत असतात. नाताळ सणाच्या काळामध्ये गोव्याला भारतातूनच नव्हे तर परदेशातून लोक जात असतात.
राजस्थान, जयपूर – अमेरिका, युरोप, फ्रान्स अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक राजस्थानमध्ये खास तेथील संस्कृती, महाल, वाळवंट पाहण्यासाठी येत असतात. जयपूर हे तर सर्वात सुंदर शहर असल्यामुळे याठिकाणी पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी दिसून येते. त्याचबरोबर राजस्थानमधील खाद्य संस्कृती देखील सुप्रसिद्ध असल्यामुळे विदेशी पर्यटक याठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
केदारनाथ – बर्फाची चादर ओढलेल्या केदारनाथमध्ये विदेशी पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते. भोलेनाथचे मंदिर पाहण्यासाठी विदेशी पर्यटक केदारनाथला आवर्जून भेट देण्यासाठी येत असतात. तुम्ही देखील केदारनाथला गेला तर तुम्हाला भारतातील लोकांसोबत विदेशी पर्यटक देखील दिसून येतील.
लडाख – बर्फाचा आनंद घेण्यासाठी आणि लॉंग ड्राईव्ह करण्यासाठी विदेशी पर्यटक लडाखला भेट देताना दिसतात. भारतातील अनेक लोक लडाखला जाण्यासाठी सोलो ट्रिप करतात. लडाखला जाणे म्हणजे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न जसे भारतीय पाहतात तसेच विदेशी पर्यटक देखील पाहत असतात. या कारणामुळेच लडाखमध्ये विदेशी पर्यटकांची गर्दी दिसून येते.