हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखाद्या व्यक्ती विमानात बसला की त्याला पृथ्वीवरील माणसे देखील मुंग्यांसारखी दिसतात. मग विचार करा की, हीच माणसं आणि पृथ्वीवरील ठराविक जागा अंतराळात गेल्यानंतर कशा दिसत असतील. तुम्ही उत्तर द्याल की, अंतराळात गेल्यानंतर पृथ्वीवरील माणस आपल्याला दिसणार नाहीत. परंतु, आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे, अंतराळात (Space) गेल्यानंतर देखील पृथ्वीवरील काही ठिकाणी एकदम स्पष्टपणे दिसतात. ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत आपण जाणून घेऊया.
1) थेम्स नदी – थेम्स ही दक्षिण इंग्लंडमधील प्रमुख नदी आहे. खास म्हणजे या नदीला अंतराळातून देखील पाहता येते. अंतराळात केलेल्या काही अंतराळवीरांनी सांगितले होते की, अंतराळातून लंडनकडे पाहत असताना त्यांना फक्त ही थेम्स नदी दिसत होती. हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
2) इजिप्तचा ग्रेट पिरॅमिड – इजिप्तमधील ग्रेट पिरॅमिड जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरातून लाखो लोक पिरॅमिडला भेट देण्यासाठी जात असतात. खास म्हणजे, हा पिरॅमिड अंतराळातूनही स्पष्टपणे दिसू शकतो. कारण, 2001 मध्ये एका अंतराळवीरांनी अंतराळातून पिरॅमिड्सचे छायाचित्र पाठवले होते. यात इजिप्तचा ग्रेट पिरॅमिड स्पष्टपणे दिसून येत होता.
3) पाम बेट – पाम जुमेरा बेट हे जगातील सर्वात मोठे कृत्रिम बेट म्हणून प्रसिद्ध आहे. ताडाच्या झाडाच्या आकारात बनवलेले हे बेट आज दुबईचे लँडमार्क म्हणून ओळखले जाते. याचे बांधकाम 2001 मध्ये करण्यात आले होते. हे बेट देखील अंतराळातून स्पष्टपणे दिसून येते.
4) गंगा नदी – भारतातच नव्हे तर जगभरात गंगा नदी प्रसिद्ध आहे. यालाच सुंदरबन आणि गंगा डेल्टा असेही म्हणले जाते. गंगा डेल्टा हे बांगलादेश आणि भारतात 350 किमी पर्यंत पसरलेले आहे. हेच गंगा डेल्टा अंतराळातून देखील स्पष्टपणे दिसते. अंतराळातून पाठवण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये गंगा डेल्टाची प्रतिमा स्पष्टपणे दिसून आली आहे.
5) हिमालय पर्वतरांग – हिमालय ही आशिया खंडातील सर्वात मोठी पर्वतरांग आहे. हा हिमालय सुमारे 20 हजार फूट उंच आहे. हा हिमालय अंतराळातून देखील स्पष्टपणे दिसतो. अंतराळातून हिमालय हा पूर्णपणे बर्फाने झाकल्यामुळे पांढरी चादर ओढल्यासारखा दिसतो.