हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात कायम शांतता टिकून राहावी, राज्यातील महिला सुरक्षित राहाव्यात कोणत्याही प्रकारचे गुन्हे राज्यात घडू नयेत यासाठी दिवस रात्र पोलीस (State Police) महिन्यात करत असतात. अशा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच राज्यातील सहायक पोलीस निरीक्षक पदी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करण्यात येणार आहे. या बातमीमुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विविध अडथळ्यांमुळे आणि विविध कारणांमुळे गेल्या दोन ते दीड वर्षांपासून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बढतीपासून पासून दूर होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी बढतीसाठी न्यायालयाची मदत घेतली होती. अखेर या न्यायालयीन लढाईत पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांमध्येच प्रमोशनसंदर्भातील अंतिम यादी तयार केली जाणार आहे. यानंतर मे महिन्यात पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकृत अधिकृत होणार आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य पोलीस दलाच्या तुकडी क्रमांक 103 मधील 440 सहायक पोलीस निरीक्षकांचे प्रमोशन होणार आहे. म्हणजेच 440 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमोशनचा लाभ मिळणार आहे. खरे तर, गेल्या अडीज वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मुद्दा प्रलंबित ठेवण्यात आला होता. ज्यामुळे याचा 600 पोलीस कर्मचाऱ्यांना फटका बसला. परंतु अखेर या पोलिसांची बढती करण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.