Bank FD : देशातील ‘या’ बँकानी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. या दरम्यान, आता खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने देखील एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. Bank FD

IDFC To Increase Stake In IDFC First Bank To 39.99%

IDFC फर्स्ट बँकेच्या एफडीचे नवीन दर

IDFC फर्स्ट बँकेच्या बचत खात्यावर आता जास्तीत जास्त 6.75 टक्के व्याज मिळेल. 15 फेब्रुवारी 2023 पासून ही वाढ लागू झाली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून आता बचत खात्यामधील 10 लाख रुपयांपर्यंतच्या FD वर 4% व्याज दर मिळेल. जर आपल्या खात्यामध्ये 10 लाख ते 1 कोटी रुपये असतील तर 6.25 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय इंडसइंड बँकेच्या FD ठेवीदारांना आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वर 7.5% पर्यंत व्याज मिळेल. Bank FD

Unity Bank unveils its new logo: Best Media Info

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीचे नवीन दर

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9.5 टक्के व्याज दिले जाणार आहे. आता बँकेच्या 1,001 दिवसांचा कालावधीच्या एफडीवर सर्व सामान्य नागरिकांना 9 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 9.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. तसेच 181 ते 201 दिवस आणि 501 दिवसांच्या एफडीवर बँकेच्या नियमित खातेदारांना 8.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. बचत खातेधारकांसाठी, युनिटी बँक 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या एफडीवर 7 टक्के व्याज दर मिळेल. 15 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

इंडसइंड बँकेच्या एफडीचे नवीन दर

इंडसइंड बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. 16 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यानंतर आता बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना FD वर जास्तीत जास्त 7.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना FD वर जास्तीत जास्त 8.25 टक्के व्याज दर मिळेल. याशिवाय इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.50% अतिरिक्त व्याज देईल. Bank FD

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.idfcfirstbank.com/personal-banking/deposits/fixed-deposit/fd-interest-rates

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा