नवी दिल्ली प्रतिनिधी | अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद जमीन विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्ट आज मध्यस्थीच्या मुद्यावर सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीवर तीन जणांची नावं सुचवली आहेत. मध्यस्थीसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकारांचा पाठिंबा होता. मात्र हिंदू महासभेने मध्यस्थीला विरोध केला होता.
त्रिस्तरीय समितीत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश असेल. कोर्टाने आठवडाभरात मध्यस्थांची प्रक्रिया सुरु करण्यास बजावलं आहे. आठ आठवड्यात मध्यस्थींना अहवाल देण्यास कोर्टाने बजाविले आहे.
सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे कि,आठवडाभरात मध्यस्थांच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. पहिल्या चार आठवड्यात त्रिस्तरीय समितीला सुरवातीचा अहवाल द्यावा लागणार आहे. फैजाबादमध्ये मध्यस्थता होईल. महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थांच्या चर्चेचं वार्तांकन करण्यास मीडियाला मनाई करण्यात आली आहे.
इतर महत्वाचे-
साताऱ्याच्या विकासकामात राजकारण करणाऱ्याला सोडणार नाही – उदयनराजे भोसले
प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आई ने पैशे न दिल्याने युवकाने जीवन संपविले
तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार