जुन्या वादातून एकमेकांवर केले चाकूने वार

0
21
crime
crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : एन -6 स्मशानभूमीजवळ चार युवकांमध्ये जुन्या वादातून आपसात हाणामारी झाली. याबाबत जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या वादावरून एन- ६ स्मशानभूमीजवळ चार युवकांमध्ये आपसात हाणामारी झाली. या प्रकरणात एकमेकांच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिघांचा समावेश असून दोघांनी मिळून एकावर चाकूने वार केला आहे.

दोन दिवसांपूर्वी उसने पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून रात्री एन-6, ख्रिश्चन स्मशानभूमी येथे शेख अनीस सलीम (३२, रा. रहेमानिया कॉलनी) याने त्याच्या मित्रावर आमेर अहेमद शहा (२१, रा. रहेमानिया कॉलनी) आणि नय्युम शहा (२२, रा. अल्तमश कॉलनी) या दोघांनी चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी चाकू हल्ला करणाऱ्या दोघांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here