नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
जिल्ह्यातील चांदवड शहरालगत असलेल्या खैसवाडा वस्तीवर अज्ञात ५ ते ६ लोकांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून मोरे यांना गंभीर जखमी केले. मोरे यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. गावकरी आणि चोरांत झालेल्या तुफान हाणामारीत एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
नामदेव मोरे खैसवाडा वस्तीवर आपल्या कुटुंबीयांसह बाहेर झोपलेले होते. एका टोळक्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे ग्रामस्थ आले. यात झटापट होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य ४ फरार झाले.
चौघांपैकी आणखी एका चोराला पकडण्यात यश आले असून त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.