भोपाळ । मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या तिसऱ्या कोरोना चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे, ११ दिवसानंतरही त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत. याबद्दल माहिती देताना राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना, सध्या मुख्यमंत्री चौहान यांच्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. परंतु, त्यांची तिसरी चाचणीही पॉझिटिव्ह आल्यानं पुढचा रिपोर्ट येईपर्यंत ते रुग्णालयातच राहतील, असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यानंतर त्यांच्यावर २५ जुलैपासून कोविड सेंटर असलेल्या चिरायु रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री चौहान यांनी ट्विट करताना ‘रविवारी सकाळी (९ व्या दिवशी) करोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सोमवारी रुग्णालयातून सुट्टी मिळेल’ अशी आशा व्यक्त केली होती. परंतु, रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यानं मुख्यमंत्र्यांचा रुग्णालयातील मुक्काम लांबला आहे. रुग्णालयातूनच मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या त्यांची पत्नी साधना सिंह आणि त्यांची मुले, कार्तिकेय आणि कुणाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरदेखील सावधगिरीचा उपाय म्हणून सगळ्यांना आपल्या घरी क्वारंटीन करण्यात आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”